कुठल्या प्रकारचा सोलर वॉटर हीटर घ्यावा?

माझ्या संपर्कातील अनेकजण मला नेहमी विचारात असतात कि कोणता सोलर घ्यावा आणि का घ्यावा.त्यांच्यासाठी :






सोलर वाटर हिटर (सौरबंब) पाणी तापवण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करते. पाणी तापवणे हा सौर ऊर्जेचा  सर्वात सामान्य उपयोग आहे. ही यंत्रणा सामान्यतः छपरावरती किंवा मोकळ्या मैदानात बसविली जाते, संग्राहकाचे तोंड सूर्याच्या दिशेने असते आणि यंत्रणेला सातत्यानं पाण्याचा पुरवठा केलेला असतो. पाणी नळ्यांमधून वाहतं, सौर ऊर्जा शोषून घेतं आणि तापतं. हे तापलेलं पाणी नंतरच्या वापरासाठी टाकीत साठवलं जातं.हि टाकी उष्णताविरोधी असल्यानं टाकीत साठवलेलं पाणी रात्रभर गरम राहतं.

फायदे 
बचत : १०० लि क्षमतेचा सौरबंब घरगुती वापरासाठी एका वीजेवर चालणा-या गीझरची जागा घेतो आणि वर्षाकाठी १५०० युनिटसची बचत करतो.
आयुष्य : १५-२० वर्ष

© किरण शानभाग
महाराष्ट्र सोलर
Ph.9403230297

परतावा कालावधी :
• ३-४ वर्षे जेव्हा वीजेऐवजी वापरलेला असेल
• ४-५ वर्षे जेव्हा भट्टीतील तेलाऐवजी वापरलेला असेल
• ६-७ वर्षे जेव्हा कोळशाऐवजी वापरलेला असेल

कुठल्या प्रकारचा सोलर वॉटर हीटर घ्यावा?

सोलरची टाकी हि उच्च दर्जाच्या स्टील पासून बनवलेली अथवा स्टेनलेस स्टील-304,316,445 ग्रेड ची असावी.बोअर अथवा विहिरीचे पाणी वापरात असेल तर गॅलवनायज्ड टाकी गंजरोधक झिंक कोटींगचीच असावी.टॅंक ची जाडी  2mm किंवा त्यापेक्षा जास्त असावी.
MS अथवा त्यावर वेगवेगळ्या नावाचे कोटेड tank अजिबात घेवू नये.MS टॅंक मध्ये गंज पकडण्याची शक्यता मोठी असतो.कोटिंग निघून गेल्यावर टाकीतून लाल पाणी येऊ शकते.
 
3 ते 4 सदस्यांचे कुटुंब एकच स्नानगृह असलेल्या घरात राहात असेल तर त्यांना दरदिवशी 100 लिटर गरम पाणी देण्याची क्षमता असलेली प्रणाली पुरते. प्रणालीची क्षमता दररोज सकाळी अंघोळीसाठी लागणार्या पाण्याच्या प्रणाणानुसार ठरवली जाते. संध्याकाळी वा इतर वेळीही गरम पाणी लागत असल्यास त्याचाही विचार सोलर वाटर हिटर ची क्षमता ठरवताना करावा लागतो.

ढगाळ हवामानाच्या दिवसांमध्ये पाणी गरम होते का?

होय.१०० टक्के.पाच वर्षामागे जुन्या तंत्रज्ञान होते,त्यावेळी अशी तक्रार होत असायची.पण सध्या थ्री लेयर  ईवाक्युटेड ट्यूब कलेक्टर वापरात असल्याने कमी प्रकाशात देखील पाणी गरम होते.

© किरण शानभाग
महाराष्ट्र सोलर
Ph.9403230297

सोलर सिस्टीम त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी पडताळून पाहणे गरजेचे आहे …

हलक्या दर्जाच्या पण नाव मोठे असणाऱ्या कंपनीची सिस्टीम किंवा अपूरी माहिती घेऊन सिस्टीम बसवलेले अनेकजण आज पश्चाताप करत आहेत. म्हणूनच तुम्ही एक जागरूक ग्राहक म्हणूनच सोलर सिस्टीम घेताना काही बाबी आवर्जून पडताळून पहा. 

▪️सिस्टीमच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन दरामध्ये खूप फरक का आहे?

▪️ विक्री पश्चात सेवा केंद्र आहेत का? 

▪️सोलर विक्रेत्यांची सेवा व प्रॉडक्ट याबाबत त्यांच्या जुन्या कस्टमर कडून फीडबॅक घेतला आहे का?

▪️तुम्ही इन्स्टॉल करत असलेल्या सोलर सिस्टीमची गॅरंटी-वॉरंटीचे प्रमाणपत्र व त्यावरील माहितीची खात्री केली आहे का?

▪️ माहितीपत्रकांवरील सोलर सिस्टीमची तांत्रिक माहिती, मटेरियल आणि प्रत्यक्षात वापरलेले मटेरियल याबाबत खात्री केली का?

▪️डिलर्स किंवा विक्री करणारा आपल्या पासून किती अंतरावर आहे व त्याची सेवा जलद आहे का?

▪️आपण इन्स्टॉल करत असलेली सोलर सिस्टीम अपडेट आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजी असलेली आहे का?

▪️आपण करत असलेल्या गुंतवणूकीचा योग्य मोबदला तुम्हास मिळतो काय ?

© किरण शानभाग
महाराष्ट्र सोलर
Ph.9403230297

किंमत :

दरदिवशी 200 लिटर (lpd) क्षमतेच्या प्रणालीची किंमत  साधारण 25,000 रूपयापर्यंतअसते. अर्थात कंपनी आणि प्रकारानुसार किंमत बदलते. बर्याचदा प्लंबर लोक,मध्यस्थ, सोलर विक्रेत्याकडून कमिशन घेतात.त्यामुळे किमत वाढू शकते.त्यामुळे सोलर घेत असताना डायरेक्ट डीलर अथवा डीस्ट्रीब्यूटरशी संपर्क साधने योग्य ठरते.शून्य टक्के व्याजदर किवा हप्त्याने सोलर विकणारे अव्वाच्या सव्वा किमत वसूल करतात. 

कोणतीही सिस्टीम विकत घेत असताना कमीत कमी १० वर्षाची Guarantee  ची लेखी मागणी करावी म्हणजे त्यामुळे दिलेल्या पैशाचा संपूर्ण परतावा मिळतोच मिळतो.सोलर घेत असताना long  टर्म विचार केला तर आपण खूप पैसे वाचवू शकतो आणि अधिक चांगल्या सोयी आयुष्य जगत असताना मिळवू शकतो..

© किरण शानभाग
महाराष्ट्र सोलर
Ph.9403230297

Comments

  1. गरम पाण्यासाठी कोणत्या प्रकारचे पाईपवापरावे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सौर बंब (सोलर वॉटर हिटर ) - शंकासमाधान

सौर पथदिवे

सौर ऊर्जा