सौर पथदिवे

सौर पथदिवे



 

रस्त्यांवर बसविल्या जाणार्या सौर दिव्यांमध्ये फोटोव्होल्टिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूर्यप्रकाशाचे डीसी विजेमध्ये रुपांतरण केले जाते. अशा त-हेने निर्माण झालेली वीज दिवसा थेट वापरता येते किंवा ती बॅटरींमध्ये साठवून रात्री वापरता येते.

या पथदिव्यांमध्ये खालील भाग असतात:
  • सौर फोटोव्होल्टिक मोड्युल
  • बॅटरी संच
  • चार्ज कंट्रोलरसह दिवा
  • दिव्याचा खांब

या भागांचा तपशील खालीलप्रमाणे:
  • ७४ वॅट सौर फोटोव्होल्टिक मोड्युल
  • १२ V, ७५ Ah ट्यूब्युलर बॅटरी, खोक्यासहित
  • चार्ज कंट्रोलर- कम – इन्व्हर्टर (२०-३५ kHz)
  • ११ वॅटचा सीएफएल दिवा
  • ४ मीटरचा स्टीलचा खांब, पक्क्या रंगासह
दुर्गम भागातील पथदिव्यांसाठी सौर पथदिवे हा एक उत्तम पर्याय आहे. या प्रणालीमध्ये वापरली जाणारी बॅटरी १०-११ तास पुरेल इतकी उर्जा साठवून ठेवण्यास सक्षम असते. शिवाय यामध्ये दिवे चालू/बंद करण्यासाठी एक स्वयंचलित बटनदेखिल असते जे सायंकाळ ते पहाट या कालावधीत दिवे वापरण्यासाठी बनविलेले असते तसेच बॅटरीला अतिरिक्त चार्ज होण्यापासून तसेच ती अतिरिक्त ड्रेन होण्यापासून म्हणजे तिची ताकद पूर्णपणे संपण्यापासून रोखते.
सौर फोटोव्होल्टिक मोड्युलचे आयुष्यमान साधारणतः १५ ते २० वर्षे असते. शिवाय यामध्ये वापरल्या गेलेल्या बॅटरींना फारशा देखभालीची आवश्यकता नसते व त्यांची कार्यक्षमतादेखील चांगली असते.

अंदाजे किंमत

सर्वात साधारण असे दिवे बसविण्यासाठी सुमारे २४,००० रुपये इतका खर्च येतो. ही किंमत प्रणालीमध्ये वापरलेल्या साहित्याच्या दर्जानुसार बदलत जाते.

फायदे:

  • विजेची गरज नाही
  • बसविण्यास सोपी
  • वापरण्यास सोपी व कमी देखभालीची गरज
  • पर्यावरणस्नेही
स्त्रोत: http://www.geda.org.in

Comments

Popular posts from this blog

सौर बंब (सोलर वॉटर हिटर ) - शंकासमाधान

सौर ऊर्जा