व्हा पॉवरबाज आणि मालदार

तुम्ही सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहक असलात म्हणून काय झाले; आता बड्या कंपन्यांप्रमाणेच तुम्हीही "पॉवरबाज‘, मालदार बनू शकता. घराच्या छतावर पैसे उगवण्याची योजना तुमच्यासाठी महावितरणने जाहीर केली आहे. इमारतीच्या गच्चीवर सोलर (सौर) पॅनेल उभे करून वीजनिर्मिती करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे निवासी, वाणिज्य, औद्योगिक वसाहती आणि हाऊसिंग सोसायट्यांचा वीजनिर्मिती करण्याचा व ती महावितरणला विकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी फक्त मोठ्या उद्योगांनाच सौरऊर्जानिर्मिती करण्याची परवानगी होती. 


वीज वापरा आणि विकाही 
महावितरणच्या कोपरखैरणे येथील उपविभागीय कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे यांनी सांगितले की, वाणिज्यिक, औद्योगिक ग्राहकांप्रमाणेच घरगुती ग्राहक सोसायट्यांच्या पातळीवर वीज सौरऊर्जा निर्माण करू शकतात. ती त्यांना तर वापरता येईलच; पण अधिकची वीज ते महावितरणला विकू शकतात. महावितरण कंपनीकडून नेटमीटरद्वारे ही वीज घेतली जाते. नवी मुंबईतील सौरऊर्जानिर्मितीचा पहिला प्रयोग खैरणे एमआयडीसीमधील व्हिसा पॉवरटेक कंपनीत केला आहे. आता सोसायट्यांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. याआधी पनवेलमध्ये निवासी वापरासाठी सौर पॅनेल उभारण्यात आले आहे. सौरऊर्जेला चालना देणाऱ्या कर्नाटक, केरळ, पंजाब, हरियाना व आंध्र प्रदेश या राज्यांच्या पंक्तीत आता महाराष्ट्र बसला आहे. 

रोज आठ किलोवॉट वीज 
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे सोसायटीच्या गच्चीवर किंवा राहत्या घराच्या छपरावर सोलर पॅनेल उभारून त्याद्वारे एका संयंत्राद्वारे वीजनिर्मिती केली जाते. अशी संयंत्रे आता ठिकठिकाणी उपलब्ध आहेत. त्यातून दररोज एक ते आठ किलोवॉट वीजनिर्मिती करता येते. दिवसा ही वीज फारशी वापरली जात नाही. अशी न वापरलेली वीज नेटमीटरिंगद्वारे महावितरणला विकता येते. यातून भारनियमन बंद होईलच; शिवाय विजेचे मासिक बिल अत्यंत कमी प्रमाणात येईल. सध्या नवी मुंबईत चार लाख नऊ हजार 30 वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडून महिन्याला 37 कोटी युनिट वीज वापरली जाते. सौरऊर्जेच्या वापराने यात मोठी बचत होऊ शकते. 

तासाला सात रुपये वाचवा 
सोलर पॅनेलांचे आयुष्यमान हे पाच वर्षांचे असते. ते खासगी कंपनीकडून उपलब्ध केले जातील; पण त्यासाठीचे अर्ज हे महावितरणकडेच करावे लागतील. सिंगल फेस ग्राहक हा आठ किलोवॉट, थ्री फेस ग्राहक 150 किलोवॉट वीज निर्माण करू शकतो. महानगरपालिका हद्दीतील ग्राहक 150 किलोवॉट ते एक मेगावॉट इतकी वीज निर्माण करू शकतो. महापालिका हद्दीबाहेरील ग्राहक 80 किलोवॉट ते एक मेगावॉट वीजनिर्मिती करू शकतो. नवी मुंबईसारख्या शहरांत औद्योगिक कारखाने, व्यापारी संकुले, निवासी व सोसायटीचे उद्‌वाहन (लिफ्ट), पाणी खेचण्याची मोटार व सामाईक दिवे यासाठी ही वीज वापरता येईल. सध्या विजेचा दर सरासरी सात रुपये युनिट असा आहे. या हिशेबाने सोसायटीचे तासाला सात रुपये वाचतील. 

दृष्टिक्षेपात 
- सौरऊर्जेने शून्य प्रदूषण, पर्यावरणाला पूरक 
- स्त्रोत 12 तास उपलब्ध 
- पावसाळ्याचे तीन महिने वगळता तर महिने वीजनिर्मिती 
- अंदाजे 72 चौरस फुटांच्या जागेत एक किलोवॉटचा सोलर पॅनेल बसविता येतो. एक किलोवॉटसाठी अंदाजे 75 हजार ते एक लाख रुपये खर्च येऊ शकतो 
- भारनियमनाच्या काळात सौरऊर्जेवरील वीज सामाईक कारणांसाठी वापरता येते 
- या प्रकल्पातील विद्युत भार हा किलोवॉटमध्ये मंजूर केला जातो. तो आठ किलोवॉट किंवा 40 ऍम्पियरपेक्षा अधिक नसावा, असे बंधन आयोगाने घातले आहे 
- प्रकल्पाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यात बॅटरीची आवश्‍यकता नाही. ऊर्जा साठविण्याची गरज नाही. 
- अधिक माहितीसाठी महावितरणची वेबसाईट www.mahadiscom.in 

आयोगाचे नियम 
एखाद्या सोसायटीचा वीज वापर कमी असेल, तर महावितरण ही वीज विकत घेईल व सरासरी खरेदी दराने सोसायटीला पैसै देईल, अशी तरतूद विद्युत नियामक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेत करण्यात आली आहे. त्यामध्ये छपरावरील सौर फोटो व्हॉल्टाईक यंत्रणेसाठी नक्तमापन म्हणजे नेटमीटरिंगची नियमावली देण्यात आली आहे. ऊर्जा मीटर, पात्र ग्राहक व वितरण परवानाधारक यांच्यात करार केला जातो. त्याची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर आहे. 

कंपनीची लाखाची बचत 
सौरऊर्जेचा प्रकल्प हा अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे वीज बचत तर होणारच आहे; शिवाय महिन्याचे लाखाभराचे वीजबिलही कमी येणार असल्याने ते अत्यंत उपयोगी असल्याचे व्हिसा पॉवरटेक कंपनीकडून सांगण्यात आले. 
 
 
 
संपर्क :
महाराष्ट्र सोलर 
काळे प्लॉट,कुची रोड,कवठे महांकाळ 
जिल्हा :सांगली ४१६४०५ 
फोन : ९४०३२३०२९७

Comments

Popular posts from this blog

सौर बंब (सोलर वॉटर हिटर ) - शंकासमाधान

सौर पथदिवे

सौर ऊर्जा