छतावर तयार केलेली वीज घेणार महावितरण
तुमच्या घराच्या, कार्यालयाच्या किंवा कारखान्याच्या छतावर
तुम्ही सौरऊर्जेद्वारे तयार केलेली वीज आता महावितरणला विकू शकता. विजेची
बचत करण्याबरोबर उत्पन्नाचे साधनही तुम्हाला मिळू शकेल. राज्यातील असा
पहिलाच पथदर्शी प्रकल्प नुकताच नगरच्या एमआयडीसीत कार्यान्वित झाला आहे.
नगरच्या एमआयडीसीत असलेल्या 'विश्वास रोडलाइन्स'चे सुहास नानासाहेब विश्वासराव यांच्यासाठी सुमीत अशोक सोनवणे यांनी आपल्या सोनकूल एनर्जी कंपनीच्या वतीने पाच किलोवॅट क्षमतेचा रूफ टॉप सोलर पॉवर प्रोजेक्ट उभारला आहे. या यंत्रणेत इमारतीच्या छतावर लावलेल्या पॅनेलच्या माध्यमातून सौरऊर्जा विद्युत ऊर्जेमध्ये परावर्तित होते. ही एसी स्वरूपातील वीज दिवे, विविध उपकरणे, तसेच यंत्रांसाठी वापरता येते.
विश्वास रोडलाइन्सची दैनंदिन गरज या रूफ टॉप सोलर पॉवरमधून भागून काही वीज शिल्लक राहत होती. शिवाय आठवड्यातील एक दिवस (शनिवारी) औद्योगिक सुटी असल्याने त्या दिवशी या प्रकल्पातील वीज वापरली जात नव्हती. त्यामुळे ही उरलेली वीज महावितरणला देता येईल, असा विचार सुहास विश्वासराव सुमीत सोनवणे यांनी केला.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने अलीकडेच 'सोलर टॉप नेट मीटरिंग' ही योजना जाहीर केली आहे. या योजनेत सौरऊर्जेवर तयार झालेली वीज विकत घेण्याची तरतूद आहे. विश्वास रोडलाइन्सने नुकताच याबाबतच करार महावितरणशी केला. त्यासाठी केवळ एक हजार रुपये शुल्क त्यांना भरावे लागले. दैनंदिन गरजेएवढी सौर वीज वापरून उरलेली वीज ते मागील आठवड्यापासून महावितरणला देत आहेत. त्यामुळे वाया जाणारी वीज वाचली असून अन्यत्र असलेली विजेची टंचाई करण्यासाठी थोडासा का होईना हातभार लागला आहे.
ज्यांच्या घराच्या, कार्यालयाच्या आणि कारखान्यांच्या छतावर सोलर पॅनेलसाठी पुरेशी जागा आहे, त्यांना विजेचा प्रश्न यापुढील काळात भेडसावू नये, अशा स्वरूपाची पावले शासनाने उचलली आहे. या सौर प्रकल्पांसाठी ३० टक्के अनुदान मिळू शकते. सुरुवातीला भांडवली खर्च अधिक असला, तरी पुढील २०-२५ वर्षांचे वीजबिल लक्षात घेता ही वीज परवडते. शिवाय नगरमध्ये पावसाळ्यातील काही दिवस वगळता वर्षभर किमान १० तास सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. त्यामुळे आगामी काळात जास्तीत जास्त नागरिकांनी सौर ऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करण्याची आवश्यकत आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे सोनवणे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.
विजेची पैशांची बचत
आमची विजेची मासिक गरज ६०० ते ६५० युनिट आहे. रूफ टॉप सोलर यंत्रणेतून साधारणत: ७५० युनिट वीज उपलब्ध होते. आमची गरज भागवून उरलेली युनिट आम्ही महावितरणला देत आहोत. महावितरणचा वाणिज्य आस्थापनांना विजेचा दर तुलनेने अधिक (सुमारे १३ रुपये) असल्याने या सोलर युनिटचा आम्हाला चांगला फायदा होत आहे. त्यातून बचतही होईल.

-सुहास विश्वासराव, विश्वास रोडलाइन्स, नगर.
Comments
Post a Comment