११ व्या योजने दरम्यान ६० सौर शहरे
सौर शहराच्या स्थापनेसाठी विकासाचा एक
महत्वाकांक्षी कार्यक्रम देशात सुरू करण्यात आला आहे. देशात महाराष्ट्रातील
नागपूर हे शहर पहिले सौर शहर असेल. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने
अशा ६० शहरांच्या स्थपनेचा ११व्या योजनेत ठराव केला आहे. एका राज्यात एक ते
जास्तीतजास्त ५ शहरांना सहाय्य करण्यात येईल असे मंत्रालयाने ठरविले आहे.
शहरातील विजेच्या वाढत्या गरजा
पुरविण्यासाठी, जीवाश्म इंधन आणि महागडी तेले आणि गॅस यांवरचे अवलंबित्व
कमी करण्यासाठी आणि अक्षय ऊर्जेला प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना विकसित
करण्यात आली.
या योजनेंतर्गत २०१२ पर्यंत नागपूर हे शहर
सौर शहराचा नमुना असेल. शहराच्या एकूण ऊर्जेच्या खपापैकी १०% ऊर्जा ही
अक्षय ऊर्जा आणि ऊर्जेच्या कार्यक्षम वापरातून घेतली जाण्याचे लक्ष्य आहे.
इतर शहरांना सौर शहरे म्हणून विकसित करण्यासाठी आणि सौर ऊर्जा शहरांचे
ऊदाहरण देण्यासाठी मंत्रालयाने २ शहरांना सौर शहरांचा नमुना म्हणून विकसित
करण्याचा निर्णय केला आहे.
मंत्रालयाच्या या योजनेंतर्गत ९.५० कोटी रूपये इतके अर्थसहाय्य सौर शहराचा मुख्य नमुना असलेल्या शहरांना विकसनासाठी म्हणून दिले जाईल. ह्या रकमेचा ५०% हिस्सा संबंधित नगरपालिका अथवा शहर प्रशासन / राज्य सरकार यांमधील सहभागावर आधारित असेल.

स्त्रोत : http://mnes.nic.in/press-releases
Comments
Post a Comment