सौरप्रकाश प्रणाली - घरगुती



घरगुती (वापरासाठी ) सौरप्रकाश प्रणाली (यंत्र)

घरगुती सौरप्रकाश प्रणाली (यंत्रणा) ही सौरऊर्जेवर काम करते. सौरसेल सौरऊर्जा थेट वीजेमध्ये रुपांतरीत करतात. ही वीज बॅट-यांमध्ये (सौर घट) साठवली जाते आणि जेव्हा गरज असेल तेव्हा प्रकाश मिळविण्यासाठी वापरली जाते.

कोठे वापरता येते?

  • वीज नसलेल्या ग्रामीण भागामध्ये
  • घरे आणि व्यापारी ठिकाणांमध्ये आपत्कालीन प्रकाशप्रणाली म्हणून

घरगुती सौरप्रकाश प्रणालीचे भाग आणि संचलन

घरगुती सौरप्रकाश प्रणाली ही स्थायी स्वरूपाची प्रणाली आहे जिची रचना घरगुती वापरासाठी करण्यात आलेली आहे.
या प्रणालीमध्ये खालील भागांचा समावेश असतो:
  • सौर पीव्ही मॉड्युल (सौरसेल)
  • प्रभार नियंत्रक (चार्ज कंट्रोलर) 
  • बॅटरी आणि  
  • प्रकाश प्रणाली (दिवे आणि पंखे)    

 सौर मॉड्युल गच्चीवर/ छतावर खुल्याजागेमध्ये, सौरप्रकाश मिळेल अशा पद्धतीने बसविले जाते आणि प्रभार नियंत्रकआणि बॅटरी घरामध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवली जाते. सौर मॉड्युलने अधिककार्यक्षमपणे काम करावे यासाठी त्याला नियमित साफ करावे लागते.
संचलनाचा (वापराची क्षमता) वेळ
हा प्रणालीच्या क्षमतेवर आधारीत असतो. मात्र बहुतेक प्रणाली बॅटरी पूर्णपणे चार्ज असताना दिवसातुन ३-४ तास काम करतील अशा पद्धतीने बनविलेल्या असतात. प्रणालीमध्ये १-२ ढगाळ दिवसांसाठीचा अतिरिक्त साठा असतो.

प्रणाली (यंत्रणा)चा खर्च आणि सबसिडी

घरगुती प्रकाश प्रणालीच्या नाबार्ड आणि एमएनआरईद्वारा अर्थसहयोग दिल्या जाणा-या तांत्रिक आणि आर्थिक बाबी (पूर्वसंमत केलेली पीव्ही प्रतिमाने)


प्रतिमान
फोटोव्होल्ट
क मॉड्युल
(डब्ल्यूपी)
१२ व्ही
बॅटरी
(एएच)
प्रणालीची सूचक
क्षमता
प्रकाशीय भार/ इतर
भार आणि संचलन
कालावधी
सूचक
किंमत (रु.)
कमाल पात्र
भांडवली
सबसिडी
(रु.)
कमाल
कर्जरक्कम
(रु.) ५%
व्याजाने
I
१०
१०
१० वॅ/ ४ तास
३०००
९००
१५००
II
१८
२०
१० वॅ/८ तास;
२० वॅ/४ तास
५४००
१६२०
२७००
III
३७
४०
१० वॅ/१२ तास;
३० वॅ/४ तास
१११००
३३३०
५५५०
IV
५०
६०
२० वॅ/८ तास;
४० वॅ/४ तास
१५०००
४५००
७५००
V
७०
७०
२० वॅ/१२ तास;
३० वॅ/८ तास;
५० वॅ/४ तास;
६० वॅ/४ तास
२१०००
६३००
१०५००
VI
८५
१२०
४० वॅ/८ तास
२५५००
७६५०
१२७५०
VII
१००
१२०
३० वॅ/१२ तास
३००००
९०००
१५०००
VIII
१२०
१३५
४० वॅ/१२ तास;
५० वॅ/८ तास
३६०००
१०८००
१८०००
IX
१५०
१५०
६० वॅ/८ तास
४५०००
१३५००
२२५००
X
१८०
१८०
५० वॅ/१२ तास
५४०००
१६२००
२७०००
XI
२००
२ x १२०
६० वॅ/१२ तास
६००००
१८०००
३००००

स्त्रोत: http://nabard.org/pdf/Eng%201%20solar%20circular-01-11-10%20with%20encl.pdf

Comments

Popular posts from this blog

सौर बंब (सोलर वॉटर हिटर ) - शंकासमाधान

सौर पथदिवे

सौर ऊर्जा