पाणी उपसा सौर यंत्रणा
पाणी उपसण्याच्या सौर फोटोव्होल्टेईक (PV) यंत्रणांमध्ये कोणते तंत्रज्ञान वापरले जाते?
सौर घट हा सौर फोटोव्होल्टेईक
यंत्रणांसाठी एक प्राथमिक उपकरण असतो कारण तो सौर किरणांना वीजेत
रुपांतरित करतो. सौर घट हे अतितरल सिलिकॉन वेफर्सपासून बनविलेले पत्रे
असतात, त्यांचा आकार आवश्यकतेनुसार कापलेला असतो. अशा अनेक एस.पी.व्ही.
घटांना जोडून आवश्यक क्षमतेचे एक एस.पी.व्ही.मोड्यूल बनवले जाते. अशी
मोड्यूल्स पुढे एकमेकांना जोडून एस.पी.व्ही. पत्रे तयार केले
जातात,जेणेकरुन पंपांसारख्या विद्युत उपकरणांना चालविण्यासाठी आवश्यक
ऊर्जेचे उत्पादन होऊ शकेल.
संपूर्ण यंत्रणेची किंमत किती असते?
पुरवठादार आणि मॉडेलवर अवलंबून एक
एस.पी.व्ही.पाणी उपसण्याची यंत्रणा बसविणे आणि ती सुरु करणे याची
सबसिडीनंतरची किंमत रु. १,९०,००० ते रु.२,७०,००० दरम्यान असते.
यासाठी कर्ज उपलब्ध आहे काय ?
भारतीय नूतनीकरणीय ऊर्जा विकास संस्था मर्यादित (आय.आर.ई.डी.ए.) द्वारे प्रति वर्ष ५% व्याजदराने सवलतीची कर्जे उपलब्ध आहेत. सवलतीच्या कर्जाची कमाल रक्कम सदर एस.पी.व्ही. पाणी उपसण्याच्या यंत्रणेच्या सबसिडी न दिलेल्या भागाच्या ९०% पर्यंत राहील. जर ही सबसिडी घेतली नाही, तर कर्जाची रक्कम सदर यंत्रणेच्या विक्री किंमतीच्या ९०% पर्यंत असू शकेल. मुद्दल रक्कम १० वर्षांमध्ये (एक वर्षाच्या अवकाशासह) व्याजासह परत फेडता येते, त्याची सूरुवात कर्ज मंजूर केल्याच्या पहिल्या वर्षाच्या अखेरीस होते.नवीन आणि एन.आर.ई. एस.पी.व्ही. पाणी उपसण्याच्या कार्यक्रमाखाली सबसिडी घेता येऊ शकते अशा एस.पी.व्ही. पाणी उपसण्याच्या यंत्रणेचे कोणकोणते उपयोग आहेत ?
कृषी आणि संबंधित उपयोग जसे
फलोत्पादन, पशुसंवर्धन, कुक्कुट पालन, अधिक मूल्याची पिकं, फळबागा,
रेशीमपालन, मत्स्यपालन, मीठागरं, पेयजल इत्यादि. या
कार्यक्रमाखाली बॅटरी चार्जिंगला अनुमती नाही.
या राष्ट्रीय प्रकल्पाखाली सौर फोटोव्होल्टेईक पाणी उपसण्याची यंत्रणा खरेदी करु शकण्यास कोण पात्र असते ?
एक वैयक्तिक शेतकरी, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, कॉर्पोरट मंडळ, संस्था आणि सरकारी विभाग इत्यादि.
एस.पी.व्ही. पाणी उपसण्याच्या यंत्रणेची क्षमता किती असते ?
एक एस.पी.व्ही. पाणी उपसण्याची
यंत्रणा २०० वॅट्स ते ३००० वॅट्सपर्यंतच्या क्षमतेच्या फोटोव्होल्टेईक
पत्र्यांसह उपलब्ध आहे. (मोटर पंपसेटची क्षमता ०.५ अश्वशक्ती ते २
अश्वशक्ती)
हा पंप किती पाणी देऊ शकतो ?
एक एस.पी.व्ही. पाणी उपसण्याची यंत्रणा ९०० वॅट्सच्या पत्र्यांसाठी दररोज किमान ६५,००० लीटर पाणी पुरविण्याची अपेक्षा आहे आणि १८०० वॅट्सच्या पत्र्यांसाठी दररोज १३५,००० लीटर पाणी स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी ७ मीटर खोलीवरुन पुरविण्याची अपेक्षा आहे. खोल विहीरीतील सबमर्सिबल पंपांच्या बाबतीत, पाण्याची उपलब्धता १२०० वॅट्सच्या पत्र्यांपासून किमान ४५००० लीटर इतकी राहील. पंपातून मिळणाऱ्या पाण्याचं प्रमाण सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्यकिरणांच्या तीव्रतेनुसार भिन्न राहील. दुपारच्या वेळी ती सर्वाधिक राहील. ज्या खोलीपासून पाणी वर काढायचं आहे ती खोली वाढत जाईल त्यानुसार पंपाद्वारे मिळणाऱ्या पाण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या घटेल. पुरवठादार ज्यावेळी सदर यंत्रणा शेतामध्ये बसवेल तेव्हा त्याने, सदर एस.पी.व्ही. पम्पिंग यंत्रणेपासून मिळणाऱ्या पाण्याच्या प्रमाणाची निश्चिती केली पाहिजे.एका विशिष्ट पिकासाठी एक यंत्रणा किती क्षेत्राला सिंचन पुरवू शकते ?
ही एस.पी.व्ही. पाणी उपसण्याची
यंत्रणा, पाणी जेव्हा १० मीटर खोलीतून उपसायचं असतं तेव्हा ०.५-६
हेक्टर जमिनीला पाणी देण्यासाठी वापरता येऊ शकते. तथापि, भूगर्भातील
पाण्याचं प्रमाण, जमिनीचा प्रकार आणि जल व्यवस्थापन हे अन्य
घटक सदर यंत्रणा वापरुन जलसिंचन करता येऊ शकण्यावर प्रभाव
टाकतात.
एस.पी.व्ही. पाणी उपसण्याच्या
यंत्रणेचे सरासरी कमाल वॅट ९०० वॅट समजून, वापरलेल्या सिंचन
पद्धतीसह विविध पिकांसाठी आवश्यक सिंचन क्षेत्र खालील कोष्टकात दिलेले आहेः
अनु.क्र.
|
पिके
|
आवश्यक
लागवड क्षेत्र हेक्टर्समध्ये
|
सिंचनाची
पद्धत
|
१
|
वर्षभर
भाज्यांची लागवड
|
१.००
|
पृष्ठभाग
|
२
|
मिरची/हरभरा
/ भुईमूग
|
१.४१
|
पृष्ठभाग
|
३
|
भाताची
रोपे
|
०.७०
|
पृष्ठभाग
|
४
|
लसूण
|
२.०८
|
लघु
सिंचन
|
५
|
काकडी
|
१.८२
|
ठीबक
|
६
|
भुईमूग
|
१.९७
|
लघु
सिंचन
|
७
|
द्राक्षे
|
२.१४
|
ठीबक
|
८
|
लिंबू
|
४.८९
|
ठीबक
|
९
|
केळी
|
२.३६
|
ठीबक
|
१०
|
डाळींब
|
७.३२
|
ठीबक
|
या पंपिंग यंत्रणेसाठी कामगिरीची हमी काय आहे ?
- एस.पी.व्ही. पत्रे दहा वर्षांच्या कामगिरीच्या हमीसह पुरवले जातात.
- मोटर पंप सेट्स आणि सुटे भाग दोन वर्षे कालावधीच्या हमीसह पुरविले जातात.
- पुढे, पंप आणि अन्य यंत्रणांचे किमान सुटे भाग देखील एस.पी.व्ही. पाणी उपसण्याच्या यंत्रणेसोबत ३ वर्षे कालावधीसाठी समस्यारहित कार्यासाठी दिले जातात.
Comments
Post a Comment