सौरऊर्जेवर चालणारे खेडे
झाशीपासून 17 किमी.
वरच्या रामपुरा खेड्यावर तळपणारा सूर्य कधीच मावळत नाही असे म्हणता येईल.
सौरऊर्जा-संयंत्र असलेले हे भारतातील पहिले खेडे आहे. तिथे वीज कधीच
पोहोचली नव्हती आणि मुले रॉकेलच्या दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करीत असत.
मात्र आता हे रॉकेलचे दिवे वापरात नसल्याने धूळ खात पडले आहेत कारण...
...आता रामपुरातील
मुले विजेच्या दिव्यांच्या प्रकाशात खेळतात आणि अभ्यास करतात. त्यांना
रेडिओ ऐकू शकतात आणि टीव्ही देखील पाहायला मिळतो - सौरऊर्जेमुळे. 31.5 लाख
रूपये खर्च करून बसवलेल्या ह्या सौरऊर्जा-संयंत्रातून 8.7 किलोवॅट वीज
निर्माण होते आणि तिथल्या ६९ घरांना ती पुरते. नॉर्वे देशातील स्काटेक सोलर
ह्या कंपनीच्या सहकार्यातून चालवल्या जाणार्या डेवलपमेंट आल्टरनेटिव्ज
ह्या ना-नफा-ना-तोटा तत्वावर चालवलेल्या संस्थेने हे संयंत्र रामपुरला दिले
आहे.
सौरऊर्जेमुळे खेडे
प्रकाशाने उजळले खरे - पण एवढ्यावरच न थांबता तेथील खेडुतांच्या अंगभूत
कौशल्यांना देखील उजाळा मिळू शकेल. सौरऊर्जेवर चालणार्या पिठाच्या
गिरणीमधून गांवकर्यांना पैसे मिळू शकतील. अनिता पाल ही तेथेच राहणारी
स्त्री खेड्यातील ऊर्जा समितीची सदस्य देखील आहे. ती म्हणते “विणकामाचा
उद्योग करून पैसे मिळवण्याचा माझा बेत आहे.”
Comments
Post a Comment