सौर उर्जेवर चालणारे विमान
प्राचीन भारतीयांना विमानविद्या अवगत होती, हा विषय वादग्रस्त असला, तरी
प्राचीन ग्रंथात विमानाचे उल्लेख आणि विमान तयार करायच्या कृतीची माहितीही
आहे. 111 वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या राईट बंधूंच्या पहिल्या विमानाचे हवेत
यशस्वी उड्डाण झाले आणि विमानयुगाचा प्रारंभ झाला. राईट बंधूंनी तयार
केलेले आणि सध्याची अत्याधुनिक वेगवान विमाने पेट्रोलवरच चालतात.
विमानासाठी प्रचंड इंधन खर्च होते. हवेचे प्रदूषणही होते. जगाच्या
क्षितिजावर रोज हजारो विमानांचे उड्डाण सुरू असते. पृथ्वीच्या भू-गर्भातले
इंधनाचे हे साठे लवकरच संपतील आणि नव्या ऊर्जेचा शोध घ्यावा लागेल, असे
शास्त्रज्ञ गेली अनेक वर्षे सांगत आहेत. त्या दृष्टीने पवन आणि सौर ऊर्जेवर
चालणारी वाहने, दिव्यांचे प्रयोग यशस्वीही झाले आहेत.
चार वर्षांपूर्वी आंद्रे बोशबर्ग याने सौर ऊर्जेवर चालणार्या विमानाची संकल्पना मांडली. विमानविद्येतल्या अनेेक तंत्रज्ञांना तो भेटला. तेव्हा त्यांनी असे विमान निर्माण होणे शक्यच नसल्याचे सांगत त्याला धुडकावून लावले होते. पण बोशबर्गने चिकाटी सोडली नाही. स्वित्झर्लंडमध्ये राहणार्या बोशबर्गला हौशी हवाई साहसवीर बट्राँड पिकार्ड याची साथ मिळाली. दोघेही कसलेले वैमानिक, यशस्वी व्यावसायिक, अभियंते आणि तंत्रज्ञ, बड्या कंपन्यांचे सल्लागार, असा त्यांचा लौकिक आहे. प्रचंड पैसा असूनही ते वसतीबाहेर पर्यावरणाशी अनुकूल असलेल्या साध्या घरात राहतात. 1999 मध्ये पिकार्ड यांनी बलूनच्या सहाय्याने जग प्रदक्षिणा घातली होती.
या दोघांनी सौर ऊर्जेवर चालणार्या विमानाचा आराखडा स्वत:च तयार केला. विमानाची रचना त्यांनीच केली. सौर उर्जेवर चालणारे विद्युत घट बनवले. सौर ऊर्जेवर हे विमान हवेत यशस्वी उड्डाण करेलच, अशी त्यांना खात्री होती. 2010 मध्ये त्यांनी सोलर इंपल्स, हे सौर ऊर्जेवर चालणारे विमान यशस्वीपणे हवेत उड्डाण करून दाखवले. त्याच वर्षाच्या जुलैमध्ये त्यांनी सलग 26 तास हे सौर विमान चालवून हे विमान रात्री देखील उड्डाण करू शकते, हे सिद्धही करून दाखवले.
जगात सौर ऊर्जेवर चालणार्या विमानाची संकल्पना अस्तित्वात आणणार्या पिकार्ड आणि बोशबर्ग यांचे सोलर इंपल्स हे विमान जग प्रदक्षिणेसाठी निघाले आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या अबूधाबीच्या विमानतळावरून हे विमान जग प्रवासासाठी आकाशात झेपावले आणि विमान वाहतुकीच्या क्षेत्रात नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. तीनच दिवसांपूर्वी हे विमान अहमदाबादच्या विमान तळावर उतरले, तेव्हा धावपट्टीवरच्या बोईंग आणि अन्य मोठ्या विमानांचा दिमाखही उतरला.
बोईंगपेक्षा सोलर इंपल्सचे पंख मोठे आहेत. 72 मीटर लांबीच्या पंखासह या विमानाचे वजन 2400 किलो आहे. ताशी 46 किलोमीटर वेगाने ते रात्री आणि दिवसा उड्डाण करू शकते. एकाच झेपेत प्रशांत आणि अंटार्टिका महासागर हे विमान पार करील. विमानाच्या बॅटर्या गरम होऊ नयेत, यासाठी विशेष इन्सुलेटरचा वापर करण्यात आला आहे. वाराणसीच्या विमानतळावरून ते पुढच्या प्रवासाला झेपावेल. येत्या पाच महिन्यात हे विमान जग प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे. विमानाच्या पंखावर 17 हजार सौर घट आहेत आणि रात्रीच्या वेळी लिथियम बॅटरीतल्या विजेवर या विमानाची इंजिने चालतात. पिकार्ड आणि बोशबर्ग हे
दोघे या विमानाचे वैमानिक आहेत. सलग उड्डाण करावे लागत असल्याने, या दोघांनीही संजय भनोट यांच्याकडून योगविद्या आणि ध्यान धारणेचे प्रशिक्षणही घेतले आहे. त्यांचे हे योग गुरू दुसर्या विमानाने या दोघांच्या पाठोपाठ कायम आहेत. 'सोलर इम्पल्स' हे जगातील पहिले सौर उर्जेवर चालणारे विमान ठरले आहे. या शोधामुळे सौर ऊर्जेच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल जगाने टाकले आहे. या विमानाने आत्तापर्यंत ४०,००० किमी प्रवास केला आहे. नुकतेच सोलर इम्पल्सने जगभ्रमंतीदेखील पूर्ण केली आहे. 'सोलर इम्पल्स' या विमानामध्ये सौर उर्जेव्यतिरिक्त इतर कुठल्याही इंधनाचा वापर केलेला नाही. गेली अनेक वर्षे आपण सौर ऊर्जा आणि त्यातील नवीन संशोधन यात होणारे बदल बघत आहोत. भविष्यात इंधनविरहित प्रवासही आता शक्य होऊ शकतो हेच या सौर विमानाच्या उड्डाणाने आपणास दिसून येत आहे.
जगावेगळ्या सफरी करण्याचे वेड तसे अनेकांना अस्ते, या सफरीतील थरार,
प्रवासादरम्यानचे थ्रिल अनुभवण्यासाठीच जगभरातील धाडसी लोक अशा अचाट गोष्टी
करत असतात. असेच धाडस हे सौर विमान घेऊन निघालेल्या दोन वैमानिकांनी केले
असून सोमवारी मध्यरात्री अॅरीझोना प्रांताच्या फोइनिक्स गावात उतरले
आहे.अॅन्ड्रे बॉश्र्बर्ग आणि ब-ट्रॅन्ड पिकार्ड हे या विमानाचे धाडसी
वैमानिक आहेत.त्यांनी आपल्या जागतिक हवाई सफरीची सुरुवात सोमवारी पहाटे
कॅलिफोर्नियापासून केली आहे.सोलार इम्पल्स टू असे या सौर विमानाचे नाव असून
ते स्वित्झर्लॅडमध्ये विकसित करण्यात आलेले आहे. इम्पल्सला बोर्इंग ७४७ या
शक्तिशाली विमानापेक्षाही जास्ती लांबीचे दोन पंख असून त्यात १७ हजारहून
अधिक सोलर सेल्स आहेत. जे सौर ऊर्जा साठवून घेत असतात. या सफरीसाठी आम्ही
मागच्या वर्षापासून सराव आणि मानसिक तयारी करत असून मागच्या आठवड्यात हवाई
ते सिलिकॉन व्हॅली अशी सफर पूर्ण केलेली आहे.हा प्रवास बहुतांशी दिवसाच
करावा लागतो. साठवलेली सौरऊर्जा रात्री प्रवासासाठी वापरता येते, मात्र लँड
करण्यासाठी योग्य ठिकाण सापडण्याची शक्यता नसल्यामुळे रात्रीचा धोका
पत्करता येत नाही,अशी माहिती बॉश्र्बर्गने दिली. मर्यादित नैसर्गिक संपदेचा
विचार करता सौर ऊर्जा या स्त्रोताची माहिती लोकांना व्हावी त्याचा प्रसार
आणि प्रचार व्हावा या हेतूने आम्ही हे धाडस करत आहोत असे त्याचा साथीदार
पिकार्ड याने नमूद केले.
Comments
Post a Comment