सामुदायिक चार्जिंग केंद्र

प्रस्तावना

नारायणपूर ह्या खेड्यात अनुसूचित जातींच्या लोकांची 16 घरे आहेत. त्यांच्या घरांमध्ये वीज नाही. त्यामुळे तेथे घरांमधून रॉकेलचे दिवे लावले जातात. रॉकेलची किंमत 30 ते 40 रुपये प्रतिलिटर आहे आणि मिळणारा उजेड फक्त 10 ल्युमेन ताकदीचा असतो. अशा प्रत्येक घरामध्ये एक सौरकंदील दिलेला आहे. हे सौरकंदील चार्ज करण्यासाठी ह्या खेड्यामध्ये एक सामुदायिक चार्जिंग केंद्र उभारलेले आहे. तेथे 60 वॅटची दोन सौर-पॅनेल्स आणि 2 सर्किट बॉक्स आहेत आणि ह्याच्या वापराने एकावेळी 16 कंदील थेट चार्ज करता येतात.

पर्यावरणीय परिणाम

घरगुती दिव्यांसाठी साधारणपणे रॉकेलवर चालणारे कंदील वापरले जातात आणि एका कंदिलास दरमहा सुमारे 2 ते 2.5 लिटर रॉकेल लागते. सौरकंदिलातून मिळणार्या0 प्रकाशाची गुणवत्ता आणि तीव्रता खूपच जास्त असते. जागोजागी एकाचवेळी लागणारी प्रकाशाची गरज लक्षात घेऊन रॉकेलवरच्या एका कंदिलाऐवजी एक सौरकंदील असे प्रमाण ठेवावे लागेल.
दरमहा दर कुटुंबातून वाचणारे रॉकेल: 2 -2.5 लिटर एक लिटर रॉकेल जाळल्याने उत्सर्जित होणार्या CO2 वायूचे प्रमाण: 2.5 किग्रॅ.
दरवर्षी १६ कुटुंबाकडून होणारी CO2 वायूच्या उत्सर्जनातली घट: 960-1200 किग्रॅ (~ 1 कार्बन क्रेडिट). प्रत्येक कुटुंब प्रत्येक दिव्यामागे रु..70~100 ची बचत करते. पूर्ण यंत्रणेच्या देखभालीसाठी ऊर्जेच्या क्षेत्रात भावी काळासाठी सामाजिक पातळीवर ठेव तयार करण्यासाठी (मुख्यतः सौरदिवेच) दरमहा प्रत्येक कुटुंबाने 25 रु. ची बचत करावी असे ठरले आहे.

सामाजिक परिणाम

सौरकंदिलाचा प्रकाश रॉकेलच्या दिव्यापेक्षा नक्कीच चांगला आणि भरपूर असल्याने मुलांना अभ्यास करणे सोपे झाले आहे. ह्या खेड्यातील लोकांनी संध्याकाळचे शिकवणीचे वर्गदेखील काढले आहेत व ह्याने तेथील शिक्षणाची पातळी नक्कीच वाढेल. तसेच सौरकंदिलांमुळे प्रत्येक कुटुंबाच्या रॉकेलच्या मासिक मागणीमध्ये घट झाली आहे. आता ह्यामुळे खुल्या बाजारातून त्यांना रॉकेल विकत घ्यावे लागणार नाही हे नक्की. रेशनवर वाजवी किंमतीला मिळणारे रॉकेल त्यांना आता पुरेल. ही यंत्रणा एकदा व्यवस्थित सुरू झाली की सांप्रदायिक स्दभावना आणि सहकार्य वाढेल. समुदायाची आर्थिक बचत (ग्रुप सेव्हिंग्ज) हरितगृह-वायू सोडणार्याग ऊर्जास्रोताकडून (रॉकेलकडून) पर्यावरणपूरक ऊर्जास्रोताकडे (सौर किंवा पुनर्वापरयोग्य इतर साधने) वळली आहे हे नक्कीच.

आर्थिक ताळेबंद

DRCSCचा वाटा

  • 2 सौर पॅनेल्सची किंमत (@ 9000.00/- ) - 18000.00
  • सौर पॅनेल बसवण्यासाठीच्या फ्रेमचा खर्च - 1500.00
  • 2 सर्किट बॉक्स आणि वायरिंगचा खर्च - 1500.00
  • 16 सौरकंदिलांची किंमत (@ 900.00/- प्रत्येकी) - 14400.00
  • कोलकात्यापासून नारायणपूरपर्यंत 16 सौरकंदील पाठवण्याचा खर्च - 6000.00
DRCSC चा एकूण वाटा - 41,400.00

सामुदायिक वर्गणी

  • एकमजली घराच्या छपरावर 3 सौर पॅनेल्स बसवण्याचा खर्च (4 मजूर @ 50.00/- प्रमाणे) - 200.00
  • छपरावर यंत्रणा बसवण्यासाठीच्या सामानाची किंमत आणि मजुरी - 500.00
  • सौर पॅनेलच्या लोखंडी सांगाड्याची किंमत आणि रंगकामाचा खर्च - 100.00
एकूण सामुदायिक वर्गणी - 800.00

स्रोत : DRCSC वार्तापत्र, अंक 6

Comments

  1. Casino Paddy Power Review 2021
    Casino Paddy 오늘 뭐 먹지 룰렛 Power Review 탱글다희 영구정지 2021. Read the Casino's 손 풀기 게임 Casino Review, including free spins, No Deposit 돌겠네진짜 bonuses, Deposit match bonuses and many 윌리엄힐 more!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सौर बंब (सोलर वॉटर हिटर ) - शंकासमाधान

सौर पथदिवे

सौर ऊर्जा