शेतकरी पुरविणार सरकारला सौरऊर्जा

गुजरातमधील छोट्या गावांतील सहा जणांची अनोखी कामगिरी
अहमदाबाद - खेडा जिल्ह्यातील धुंडी या लहानशा गावातील सहा प्रगतिशील शेतकऱ्यांनी सौरऊर्जा निर्मितीमध्ये अनोखी कामगिरी करत देशातील सर्व शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. या शेतकऱ्यांनी सहकारातून केलेल्या या कामामुळे ते गुजरात सरकारलाही सौरऊर्जा पुरविण्याच्या स्थितीत आले आहेत.

धुंडी हे गाव अहमदाबादपासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे. तीनशे उंबरठ्यांच्या या गावात फक्त दोन जणांकडे पदवी आहे. अशा या गावातील प्रवीण परमार, किरीट सोलंकी, रामभाई चावडा, उदाभाई चावडा, लक्ष्मणभाई परमार आणि फुदाभाई परमार या सहा शेतकऱ्यांनी एकत्र येत पन्नास लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प राबविला आहे. प्रवीण परमार हा तर 29 वर्षांचा युवा शेतकरी आहे. या सहा शेतकऱ्यांनी उभारलेल्या सौर प्रकल्पातून केवळ त्यांची शेतीच्या कामासाठी असलेली विजेची गरजच भागत नाही, तर अतिरिक्त ऊर्जा सरकारलाही पुरविण्याची त्यांनी तयारी दर्शविली. गावातील इतर शेतकरीही याच ऊर्जेद्वारे निर्माण होणाऱ्या विजेचा वापर करत शेताला पाणी देतात.

स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रातील या शेतकऱ्यांनी घेतलेल्या या पुढाकाराची दखल घेत राज्याच्या वीज वितरण कंपनीने त्यांच्याशी कायदेशीर करारच केला आहे. पुढील पंचवीस वर्षे आता हे शेतकरी सरकारला 4.37 पैसे प्रतियुनिट या दराने सौरऊर्जेचा पुरवठा करणार आहेत. याद्वारे या सहा शेतकऱ्यांना दर महिन्याला प्रत्येकी चार हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे. आणंद येथे सध्या सुरू असलेल्या कृषी महोत्सवातही त्यांच्या या कामाची दखल घेत मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी आज त्यांचा सत्कार केला.

असा उभारला प्रकल्प

या सहा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सौरउर्जा सहकारी सोसायटीची स्थापना करत प्रकल्प उभा केला. गेल्या पाच महिन्यांपासून या प्रकल्पातून त्यांनी ऊर्जेचा वापर सुरू केला आहे. या प्रकल्पात त्यांनी आठ ते दहा किलोवॉट क्षमतेच्या सौर पॅनेलचा वापर केला. यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय जलव्यवस्थापन संस्थेचे तांत्रिक मार्गदर्शन मिळाले. पन्नास लाख रुपयांपैकी पाच लाख रुपये शेतकऱ्यांनी स्वत:जवळचे घातले, तर उर्वरित 45 लाख रुपये फाउंडेशन फॉर इकॉलॉजी सिक्‍युरिटी आणि जेर्मी या दोन संशोधन संस्थांनी दान दिल्याची माहिती व्यवस्थान संस्थेच्या सल्लागार नेहा दुर्गा यांनी दिली.

स्त्रोत : इ-सकाळ, १० मे २०१६ 

Comments

Popular posts from this blog

सौर बंब (सोलर वॉटर हिटर ) - शंकासमाधान

सौर पथदिवे

सौर ऊर्जा