घरावरच्या छतावर सोलर पैनल बसवून करा वीज निर्मिती व अतिरिक्त वीज विकून पैसे कमवा



महाराष्ट्र राज्यनियामक आयोगाने  दि. १० सप्टेंबर २०१५ रोजी  घराच्या छतावर सौरउर्जा पैनेल बसवून वीज निर्मिती करून महावितरण आदी कंपन्यांच्याजाळ्याला (ग्रीड) जोडण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेऊन नेट मीटरिंग पॉलिसी जाहीर केली आहे .



या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे सोसायटीच्या गच्चीवर किंवा राहत्या घराच्या छपरावर सोलर पॅनेल उभारून त्याद्वारे सोलर फोटो व्होल्टाइक पैनल द्वारे वीजनिर्मिती केली जाते यामध्ये निर्माण झालेली वीज थेट महावितरण च्या जाळ्याला (ग्रीड) ला जोडली जाऊ शकते. आपल्या घरावरच्या सोलर पैनल मधून तयार होणारी अतिरिक्त वीज ग्राहक विकून पैसेहि कमवू शकतात.  अशी संयंत्रे आता ठिकठिकाणी उपलब्ध आहेत. त्यातून दररोज एक ते आठ किलोवॉट वीजनिर्मिती करता येते. दिवसा ही वीज फारशी वापरली जात नाही. अशी न वापरलेली वीज नेटमीटरिंगद्वारे महावितरणला विकता येते. यातून भारनियमन बंद होईलच; शिवाय विजेचे मासिक बिल अत्यंत कमी प्रमाणात येईल.

सौर वीज निर्मिती यंत्रणा पंचवीस ते तीस वर्षे पूर्णपणे देखभाल विरहित असून यातून अव्याहत पणे फुकट वीज मिळत राहते.  सुरवातीला या यंत्रणेचा खर्च साधारणपणे सत्तर हजार रुपये प्रती किलो वॉट इतका येतो. या सौर वीज निर्मितीला शासनाकडून कर्ज ही मिळते.

नेट मीटरिंग







एखादा ग्राहक जेव्हा फोटो व्होल्टाइक पैनल द्वारे वीज निर्माण करतो, तेंव्हा हि निर्माण झालेली वीज डी. सी. (डायरेक्ट करंट) पद्धतीची असते. 'इन्व्हर्टर' या उपकरणाचा वापर करून या विजेचे ए.सी. (आल्टरनेट करंट) उर्जेत रुपांतर केले जाते. ग्राहकाने निर्माण केलेली हि सौर उर्जा थेट महावितरण च्या जाळ्याला (ग्रीड) ला जोडलीजाते. ग्राहकाच्या आणि विज मंडळाच्या यंत्रणांमध्ये एक टु-वे मीटर (नेट मीटर) जोडला जातो. या वैशिष्ठ्यपूर्णमीटर मध्ये ग्राहकाकडून महावितरण च्या ग्रीड ला जाणाऱ्या विजेची नोंद व महावितरण च्या ग्रीड मधूनग्राहकाकडे येणाऱ्या विजेची नोंद घेतली जाते. ग्राहकाने वीज मंडळाकडून घेतलेली वीज (इम्पोर्ट) आणि ग्राहकाने वीज मंडळाला दिलेली वीज या फरकातून वीज देयके बनवली जातात. यामुळे अर्थातच ग्राहकाने निर्माण करून वीज मंडळाला दिलेल्या विजेचा मोबदला ग्राहकाला मिळतो. थोडक्यात स्वतःच्या गरजेप्रमाणे वीज वापरूननिर्माण केलेली अतिरिक्त वीज, वीज मंडळाला विकता येते. अर्थात असे करताना महाराष्ट्र राज्य विद्युतनियामक आयोगाने (एम.इ.आर.सी.) ठरवलेल्या नियमांतर्गत राहून हा फायदा आपल्याला घेता येतो.


 फोटो व्होल्टाइक पैनल द्वारे वीज निर्मिती मध्ये सातत्याने होत असलेल्या संशोधनामुळे आणि सौर उर्जानिर्मितीस प्रोत्साहन देण्याच्या शासनाच्या धोरणामुळे या यंत्रणांच्या किमती वेगाने कमी होत आहेत.तसेच पारंपारिक विजेच्या वाढत्या दरामुळे प्रत्येकाने सौर उर्जा निर्माण करून वीजमंडळाच्या ग्रीड लाजोडल्यास साधारणपणे पाच ते आठ वर्षातच केलेल्या खर्चाची परतफेड होऊ शकते. साधारणपणे नऊ ते दहा स्क्वे. मीटर आकाराच्या उघड्या जागेत एक किलो वॉट चा सौर उर्जा पैनल बसवत येतो. त्यामुळे घराचे पत्रे, कौले, गच्चीवर तसेच कारखान्यांच्या इमारतींवर असे रुफ टॉप सोलर पैनल बसवून आपली स्वतःची वीज निर्मिती करून देशाचा व आपला विकास करू शकतो.

महावितरण कंपनीकडून नेट मीटरिंगसंबंधी ग्राहकांसाठी महत्वाचे दुवे

रुफ-टॉप  सोलर  पीव्ही - पाहिजे ती कनेक्टीव्हिटी देण्यासाठी ग्राहकांकरिता मार्गदर्शक तत्वे (इंग्रजीतून) 

वितरण परवानाधारक नेटवर्क बरोबरची  रूफ सोलर पीव्ही प्रणाली कनेक्टिव्हिटी अर्ज प्रक्रिया (नेटमीटरिंग साठी प्रक्रिया) (इंग्रजीतून)

नेट मीटरिंग साठी  रूफ सोलर पीव्ही यंत्रणा बसविण्याकरिता अर्ज (इंग्रजीतून)

नेटमीटरिंग जोडणी करार (कनेक्शन अॅग्रीमेंट) (इंग्रजीतून)

महावितरण ने जारी केलेले   - व्यवसायिक करारपत्रक (इंग्रजीतून)

महावितरण कंपनी ने दिलेला नेट मीटरिंग साठी मीटर तपशील


एलटी एसी सिंगल फेज 5-30 अम्पीअर स्टॅटिक नेट एनर्जी मीटर (इंग्रजीतून)

थ्री फेज, चार वायर 10 – ४० अम्पीअर – नेट मीटरिंग साठी  तांत्रिक तपशील (इंग्रजीतून

स्त्रोत : www.mahadiscom.in

संपर्कासाठी
माझा फोन नंबर : 09403230297
माझा Email: maharashtrasolar@gmail.com



Comments

Popular posts from this blog

सौर बंब (सोलर वॉटर हिटर ) - शंकासमाधान

सौर पथदिवे

सौर ऊर्जा