इमारतींच्या गच्चीवर सोलर पॅनेल्सला महावितरणकडून हिरवा कंदील


नवी मुंबई - इमारतीच्या गच्चीवर सोलर पॅनेल्स उभे करून वीजनिर्मिती करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे निवासी, वाणिज्य, औद्योगिक वसाहती आणि हौसिंग सोसायट्यांचा वीजनिर्मिती करण्याचा व ती महावितरणला विकण्याचा मार्ग मोकळा झाला आहेअशा प्रकारची वीजनिर्मिती करण्याचा नवी मुंबईत पहिला प्रयोग खैरणे औद्योगिक वसाहतीमध्ये करण्यात आला आहे. महावितरण कंपनीकडून नेटमीटरच्या माध्यमातून सौर उर्जा उपलब्ध करून वाणिज्य, औद्योगिक आणि सोसायटीच्या पातळीवर वीज निर्माण करून ती महावितरणला विकू शकता येते, अशी माहिती कोपरखैरणे येथील महावितरणच्या उपविभागीय  कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे यांच्याकडून  देण्यात आली.


कोपरखैरणे येथील महावितरणाच्या विभागीय कार्यालयातून सोलर पॅनेल्सचा पहिला प्रयोग हा खैरणे एमआयडीसीमधील विसा पॉवर प्राव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये नुकताच करण्यात आला असून नवी मुंबईतून पहिला प्रयोग असल्याचे भांडूप झोन महावितरणचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी  सांगितले.  सौर ऊर्जेला चालना देणाऱ्या कर्नाटक, केरळ, पंजाब, हरियाना व आंध्रप्रदेश या राज्यांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा मान आता महाराष्ट्राला मिळाला आहे. अशा प्रकारची वीजनिर्मिती करण्याचा नवी मुंबईतला पहिला प्रकल्प खैरणे औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आला आहे. याआधी पनवेलमध्ये देखील सोलारचा प्रयोग करण्यात आला आहे. त्याठिकाणी निवासी वापरासाठी सोलर उभारण्यात आले आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे सोसायटीच्या गच्चीवर किवा राहत्या घराच्या शेडवर सोलर पॅनेल्स उभारून त्यामार्फत एका संयंत्राद्वारे वीजनिर्मिती केली जाते. अशी संयंत्रे आता ठिकठिकाणी उपलब्ध आहेत. त्यातून दररोज एक ते आठ किलोवॅट वीजनिर्मिती करता येते. दिवसा ही वीज फारशी वापरली जात नाही. अशी न वापरलेली वीज नेटमीटरिंगद्वारे वीज महावितरण मंडळाला विकता येते.

सौर उर्जेमुळे मोठ्या प्रमाणावर वीज बचत तर होईलच पण त्यासोबत प्रदूषण देखील रोखले जाईल. सौर उर्जेने भारनियमन देखील थांबले जाणार आहे. यामुळे प्रदूषण विरहित वीज तर निर्माण करता येईल पण त्याचसोबत विजेची बचत होणार आहे. याआधी फक्त मोठ्या उद्योगांनाच सौरउर्जा निर्मिती करण्याची परवानगी होती पण आता सर्वसामान्य देखील स्वत:च्या गरजेनुसार वीज निर्मित करू शकतो आणि महावितरणाला विकू देखील शकतो.

सोलरसाठी अंदाजे ७२ स्वेअर फुटाच्या जागेत एक किलो सोलर पॅनल बसविता येते. एक किलो वॅट सोलरसाठी अंदाजे ७५ ते १ लाख रुपये खर्च येवू शकतो सोलर पॅनेल्सचे आयुष्यमान हे पाच वर्षाचे असून त्याचे मॉडेल हे खाजगी कंपनीकडून उपब्लध केल्या जाणार आहेत. पण यासाठी अर्ज हे महावितरणकडेच करावे लागणार आहेत. सिंगल फेस ग्राहक हा आठ किलो वौट वीज निर्मित करू शकतो तर थ्री फेस ग्राहक हा १५० किलोवॅटवीज निर्माण करू शकतो. १५० किलो वॅट ते १ मेगावॅट हे महानगरपालिका हद्दीतील ग्राहक वीज निर्मित करू शकतो तर 80 किलोवॅट ते १ मेगावॅट वीज निर्मिती ही महापालिका बाहेरील ग्राहक करू शकतो.

Comments

  1. ही सुविधा विषयी महावितरण कधीच सांगत नाही याचा प्रचार करायला पाहिजे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सौर बंब (सोलर वॉटर हिटर ) - शंकासमाधान

सौर पथदिवे

सौर ऊर्जा